Shraddha Kapoor | बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या मराठमोळ्या अंदाजामुळे नेहमीच ओळखली जाते. नुकतेच Waves Summit 2025 ला सुरूवात झाली आहे. या शिखर परिषदेत चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाला इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO अॅडम मोसेरी यांनी देखील हजेरी लावली. यावेळी श्रद्धा कपूरने त्यांच्याशी संवाद साधला, एवढेच नाही तर तिने त्यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीने पाहुणचार देखील केला. श्रद्धा कपूरने अॅडम मोसेरी यांचे पुरणपोळी खाऊ घालून स्वागत केले. श्रद्धा घरी बनवलेली पुरणपोळी खास अॅडम मोसेरी यांच्यासाठी घेऊन आली होती. सध्या श्रद्धाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धा अॅडम मोसेरी यांनी म्हणते की, तुम्ही फॅन्सी ठिकाणी जेवता. तुम्ही भारतीय जेवणाची चव देखील चाखली आहे. पण मी तुमच्यासाठी एक महाराष्ट्रीयन गोड पदार्थ घेऊन आली आहे. तुम्ही माझ्या घरी बनलेली पुरणपोळी खाऊन पाहा. त्यानंतर अॅडम मोसेरीने पुरणपोळीचा आस्वाद घेतला आणि त्यांनी पुरणपोळीचे कौतुकही केले. Shraddha त्याआधी, बुधवारी संध्याकाळी अॅडम मोसेरी यांनी बॉलिवूडमधील पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीसोबत डिनर केले. मोसेरी यांनी इन्स्टाग्रामवर डिनर आउटिंगचा एक सेल्फी देखील शेअर केला. Shraddha Kapoor | दरम्यान, श्रद्धा कपूर उत्तम अभिनयासह आपल्या साधेपणामुळे चाहत्यांच्या पसंतीस पडते. श्रद्धाचा अलीकडेच ‘स्त्री 2’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमातील श्रद्धाच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं. हेही वाचा : सर्जिकल स्ट्राईकवरील विधानावरून चरणजित चन्नी यांचा यु-टर्न ; म्हणाले,’आता मी पुरावे नाही मागणार’