प्रेरणादायी! उरुळीच्या सागरची पोलीस उपनिरीक्षकपदाला गवसणी
Updated On:

उरुळी कांचन – येथील सागर तुकाराम ताले या तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात सागरने मिळविलेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सागरचे वडील तुकाराम ताले हे उरुळी कांचन येथे महावितरणचे तंत्रज्ञ म्हणून काम करतात. सागरचे प्राथमिक शिक्षण उरुळी कांचन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालयात झाले आहे.
इंजिनियरिंगचे शिक्षण तळेगाव दाभाडे येथे पूर्ण केले. सागरने आई- वडिलांच्या दैनंदिन काबाडकष्ट आणि मेहनतीचे जवळून अनुभव घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा 2019 ला घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 9 मार्च 2022 ला जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सागरने राज्यात 122 वा क्रमांक मिळविला आहे.




