INS Arnala : आता नौदलाची वाढणार सागरी ताकद ! देशातील पहिली ‘अर्नाळा सबमरीन’ सज्ज

विशाखापट्टणम : भारतीय नौदल १८ जून रोजी विशाखापट्टणम येथील नेव्ही डॉकयार्ड येथे देशातील पहिले अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) अर्नाला कमिशनिंग करणार आहे. कमिशनिंग समारंभाचे प्रमुख पाहुणे सीडीएस जनरल अनिल चौहान असणार आहेत.आयएनएस अर्नाला ८ मे रोजी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले. तथापि, या कमिशनिंग समारंभात १६ एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी श्रेणीतील जहाजांपैकी पहिले भारतीय नौदलात औपचारिकरित्या समाविष्ट झाले.
मेसर्स गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (जीआरएसई) कोलकाता आणि मेसर्स एल अँड टी शिपबिल्डर्स, अर्नाला सोबत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत डिझाइन आणि बांधणी करण्यात आली आहे, ही संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारतच्या यशाची साक्ष आहे. हे जहाज खास करून उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आले आहे. हे शत्रूच्या पाणबुड्यांचा मागोवा घेणार, त्यांना निष्क्रिय करणार आणि सागरी हल्ल्यांपासून भारतीय समुद्रकिना-याचे संरक्षण करणार.
आयएनएस अर्नाळा हे एकूण १६ अँटी-सबमरीन वॉरफेअर श्रेणीतील युद्धनौकांच्या मालिकेतील पहिले जहाज आहे, जे औपचारिकपणे भारतीय नौदलात सामील होणार आहे. हे युद्धनौके भारतीय सागरी सुरक्षेतील फोर्स मल्टिप्लायर ठरणार असून हिंदी महासागरात नौदलाची उपस्थिती अधिक बळकट करणार आहे. यामुळे भारताची सागरी ताकद फक्त वाढणार नाही, तर स्वदेशी संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊलही ठरणार आहे.
महाराष्ट्रातील अर्नाळा किल्ल्यावरून नाव
महाराष्ट्रातील वसई येथील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यावरून त्याचे नाव देण्यात आले आहे. हे जहाज हिंदी महासागरात नौदलाच्या मजबूत उपस्थितीसाठी डिझाइन केले आहे. ते उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्या शोधेल, त्यांचा मागोवा घेईल आणि त्यांना निष्क्रिय करेल.
आयएनएस अर्नालाची खास वैशिष्टये
लांबी – सुमारे ७७ मीटर
वजन – सुमारे ९०० टन
वेग – २५ नॉट्स पर्यंत (सुमारे ४६ किमी/तास)
क्रूची संख्या – ५७ खलाशी (अंदाजे)
सोनार सिस्टीम – प्रगत हल-माउंटेड सोनार आणि टो-ऍरे सोनार
शस्त्रे- टॉर्पेडो, एएसडब्ल्यू रॉकेट लाँचर, ३० मिमी बंदुका
रडार आणि सेन्सर्स – आधुनिक नेव्हिगेशन रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली
डिझाइन वैशिष्ट्ये- स्टील हल, कमी ध्वनिक स्वाक्षरी, उच्च गतिशीलता
बिल्डर – गार्डन रीच शिपबिल्डर्स





