Google Maps: गुगल मॅपवर मिळणार शहरातील प्रदूषणाची माहिती

नवी दिल्ली – गुगल कंपनीच्या गुगल मॅपवर आता स्थानिक पातळीवर हवेतील प्रदूषणाची माहिती मिळणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत असल्याचे गुगल कंपनीने जाहीर केले. या सेवेमुळे सरकारी यंत्रणांना आणि नागरिकांना हवेच्या शुद्धतेसंदर्भात योग्य प्रकारची माहिती मिळेल आणि त्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
दिल्लीत सध्या एअर क्वालिटी इंडेक्स तब्बल 491 अंकावर गेला आहे. यामुळे राजधानीतील शाळा ऑनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. बांधकाम क्षेत्राचे कामकाज थांबविण्यात आले आहे. वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
इतर शहरात प्रदूषण वाढल्यानंतर स्थानिक प्रशासन अशा प्रकारच्या उपाययोजना गुगलच्या माहितीच्या आधारावर करू शकणार आहेत. भारत आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रदूषणासंदर्भात योग्य माहिती मिळावी यासाठी आम्ही ही सेवा सुरू केली आहे.
यासाठी वातावरण तंत्रज्ञानावर काम करणार्या अॅशुअरन्स अँड रिस्पेअर लिविंग सायन्सेस या कंपनीने विशिष्ट प्रकारचे सेन्सर तयार केले आहेत. या सेन्सरमुळेच संबंधित शहरातील हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करता येते.





