Rajasthan Influencer Arrested – राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव भवरी उर्फ भाविका असे आहे. तिचे इंस्टाग्रामवर ८३,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी रविवारी चितळवाना परिसरातील शिवाडा चौकीतून तिला ताब्यात घेतले. ती बसमधून बारमेरहून गुजरातला जात असताना तिला ताब्यात घेऱ्यात आले. झडतीदरम्यान महिलेच्या बॅगेतून १५० ग्रॅमहून अधिक एमडी (मेफेड्रोन) जप्त करण्यात आले. एनडीपीएस कायद्यांतर्गत बंदी घातलेला हा अंमली पदार्थ आहे. तपासात असे दिसून आले आहे की ती गुजरातमध्ये हे अंमली पदार्थ पुरवणार होती. ही एक हाय प्रोफाइल अटक मानली जात आहे, कारण आरोपी सोशल मीडियावर सक्रिय आणि प्रभावशाली मानली जाते. या प्रकरणात एक मोठी तस्करी टोळी सक्रिय असल्याचा प्रशासनाला संशय आहे. जप्त केलेले साहित्य त्याच्या स्रोताची आणि गुणवत्तेची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ही अटक ड्रग्ज तस्करांच्या मोठ्या नेटवर्कशी जोडलेली असू शकते असा अधिकाऱ्यांचा कयास आहे.