महागाई डिसेंबरनंतर कमी होणार
Updated On:

नवी दिल्ली –लॉकडाऊनमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्यामुळे किरकोळ किमतीवर आधारित महागाई 7 टक्क्यांवर गेली आहे. ती डिसेंबरपर्यंत कमी होण्याची शक्यता नाही, असे स्टेट बॅंकेच्या संशोधन अहवालात म्हटले आहे.
सोमवारी ऑगस्ट महिन्याच्या महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. जुलै महिन्यात या महागाईचा दर 6.93 टक्के होता. रिझर्व्ह बॅंकेने महागाईचा दर चार टक्क्यांच्या आत रोखण्याचे ठरवले आहे.
मात्र, गेल्या काही महिन्यापासून यात यश मिळाले नसल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने मागील पतधोरणात व्याजदरात कपात केली नाही. आता या आर्थिक वर्षामध्ये व्याजदरात कपात होण्याची शक्यता महागाई वाढल्यामुळे मंदावली असल्याचे स्टेट बॅंकेला वाटते.





