पुणे | सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आयाती खाद्यतेलांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागू केल्यामुळे गेले अनेक दिवस मंदीत असलेल्या खाद्यतेलांच्या दरात ऐन सणासुदीच्या तोंडावर मोठी दरवाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेल वगळता सर्वच खाद्यतेलांच्या दरात १५ किलो/लिटरच्या डब्यामागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली.
गोटा खोबरे दरात दहा किलोमागे, तर खोबरेल तेल दरात २१५ किलोच्या दोनशे रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. नारळाची दरवाढ सुरूच असून, सर्व प्रकारच्या नारळाच्या दरात शेकड्यामागे आणखी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली.
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकास योग्य भाव मिळावा, यासाठी आयाती खाद्यतेलांवरील शुल्क वाढविण्याचा सरकारचा निर्णय योग्य असला, तरी वाढीचे प्रमाण आणि वेळ चुकीची निवडण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
कारण सध्या सणासुदीचा मोसम असल्याने या निर्णयामुळे खाद्यतेलांच्या किमती किलोमागे तब्बल वीस ते बावीस रुपयांपर्यंत वाढल्याने ग्राहकांवरील बोजा वाढला आहे.
दरवाढ आवश्यक असली, तरी ती टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक होते. आयात शुल्कवाढीनंतर जागतिक बाजारात खाद्यतेलांचे दर नेहमी काही प्रमाणात कमी होतात. त्यामुळे दरवाढीचा फटका कमी बसतो.
या वेळी मात्र उलटा अनुभव येत आहे. शुल्कवाढीच्या निर्णयानंतर दर कमी होण्याऐवजी गेल्या काही दिवसांत आंतराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात टनामागे शंभर डॉलर्सनी वाढ झाली आहे.
यामुळे खाद्यतेलांच्या दरवाढीस आणखी चालना मिळाली आहे. गेल्या आठवडयात सोयाबीन, पाम, तसेच सरकी तेलाच्या दरात डब्यामागे आणखी शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली.
यामुळे वनस्पती तुपाचे दरही डब्यामागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले, तर खोबऱ्याच्या तुटवड्यामुळे आणि भाववाढीमुळे खोबरेल तेलही १५ किलोमागे आणखी दोनशे ते अडीचशे रुपयांनी महागले. शेंगदाणा तेलाच्या दरात मात्र फारसा बदल आढळला नाही.
सुर्यफूल तेलाची आयात पुरेशा प्रमाणात होत असल्यामुळे दरात मोठी वाढ पाहावयास मिळाली नाही. दरम्यान, तुटवड्यामुळे नारळ, गोटा खोबरे दरात प्रचंड वाढ झाली आहे.
केरळ, तामिळनाडू, तसेच कर्नाटक येथील उत्पादन केंद्रातच सध्या नारळाचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. या केंद्रातून संपूर्ण देशभर नारळाचा पुरवठा केला जातो. तुटवड्यामुळे भाव सातत्याने वाढत आहेत.
सध्या नारळाची आवक मंदावली असून, मागणी चांगली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात सर्व प्रकारच्या नारळाच्या दरात शेकड्यामागे आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झाली.
सर्वांत हलक्या नारळाचा घाऊक बाजारातील शेकड्याचा दर आता दोन हजार रुपयांवर पोहोचला असून, भारी प्रतीच्या मद्रास नारळाचा दर ३५०० रुपयांवर पोहोचला आहे. यंदा नारळाचे पीक कमी असून, जुना साठाही अपुरा आहे.
यामुळे गोटा खोबऱ्याचे दर वाढत आहेत. गेल्या आठवड्यात गोटा खोबरे दरात दहा किलोमागे ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली.
आवक- जावक साधारण असल्यामुळे तुरडाळीसह अन्य सर्व डाळी आणि कडधान्ये, तसेच गहू, ज्वारी, बाजरी आणि रवा, मैदा आणि आटा, साखर आणि गुळाचे दर गेल्या आठवड्यात स्थिर होते.
घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –
साखर (प्रतिक्विंटल) ३८८०-३९०० रु.
खाद्यतेले (१५ किलो/लिटर):- शेंगदाणा तेल २५५०-२६००, रिफाइंड तेलः २३००-२९५०, सरकी तेल
१९००-२२००, सोयाबीन तेल १८५०-२१००, पामतेल १८५०-२१००, सूर्यफूल रिफाइंड तेल १८५०-२१००,
वनस्पती तूप १९००-२२००, खोबरेल तेल ३१००-३२०० रु.
तांदूळ :- गुजरात उकडा ४०००-४५००, मसुरी ४०००-४५००, सोना मसुरी ५०००-५५००, एचएमटी
कोलम ५५००-६५००, लचकारी कोलम ६५००-७०००, चिन्नोर ४५००-५०००, (११२१) -११०००-११५००,
आंबेमोहोर (सुवासिक) ७०००-८०००, बासमती अखंड १२०००-१३०००, बासमती दुबार ९५००-१००००,
बासमती तिबार १००००-१०५००, बासमती मोगरा ५५००-६५००, बासमती कणी ४०००-४५००, (१५०९) – ८५००-९५००, इंद्रायणी ५५००-६००० रु.
गहू – सौराष्ट्र लोकवन नं. १ ४३००-४५००, सौराष्ट्र लोकवन नं. २ – ३८००-४०००, एमपी लोकवन नं. १ – ४२००-४४००, नं. २ – ३७००-४०००, नं. ३ – ३३००-३५००, सिहोर ५६००-६०००, सिहोरी ४३००-४३००, मिलबर ३१५०-३२०० रु.
ज्वारी :- गावरान नं.१- ५१००-५४००, गावरान नं.२ – ४०००-४४००, नं.३ ३३००-३४००, दुरी नं. १ – ३२००-३३००, दूरी नं. २ – ३०००-३१०० रु.
बाजरी :- महिको ३४००-३८००, गावरान ३२००-३४००, हायब्रीड २८००-३१०० रु.
गूळ:- गूळ एक्स्ट्रा – ४३५०-४५००, गूळ नं. १ – ४१५०-४३००, गूळ नं. २ – ४०००-४१०० गूळ नं. ३ – ३८५०-
३९५०, बिगररसायन बॉक्स – पॅकिंग ४१००-५३००
डाळी:- तूरडाळ १३०००-१६५००, हरभराडाळ ९२००-९५००, मूगडाळ १०५००-१०८००, मसूरडाळ ७४००-
७५००, मटकीडाळ १००००-१०१००, उडीदडाळ ११०००-१२५०० रु.
कडधान्ये:- हरभरा ८४००-८५००, हुलगा- ७५००-७७०० चवळी ९०००-११००, मसूर ६८००-६९००, मूग
८८००-९२००, मटकी गावरान ७५००-८५००, मटकी पॉलिश ७५००-८०००, मटकी गुजरात ७५००-
८०००, मटकी राजस्थान ७५००-८०००, मटकी सेलम ९८००-१००००, वाटाणा हिरवा १५०००-१८०००,
वाटाणा पांढरा ४५००-४६००, काबुली चणा १५०००-१७००० रु.
साबुदाणा :– साबुदाणा नं. १ – ७०००, साबुदाणा नं. २ – ६८००, साबुदाणा नं. ३ – ६५०० रु.
वरई भगर :- १००००, सावा भगर ९५००, गोटा खोबरे २०००-२२०० रु.
शेंगदाणा :- जाडा १००००-११०००, स्पॅनिश – ११०००-११२०० घुंगरू १०२००-१५०००, टीजे ८००० रु.
धने :- गावरान ९०००-१००००, इंदूर १२०००-१५००० रु.
पोहे :- मध्य प्रदेश ४३००-४५००, पेण ४४००-४५००, मध्यम पोहा ४२००-४३००, दगडी पोहा ४३००-
४८००, पातळ पोहा ४९००-५७००, सुपर पोहा ४८००-५४००, भाजका पोहा ६००-७००, मका पोहा
५७५-६७५, भाजके डाळे ४४००-४९००, मुरमुरा राजनांदगाव (९ किलोस) ५४०, भडंग ८५०-१०००,
घोटी ५३०, सुरती ५५० रु.
रवा, मैदा, आटा – (५० किलोचा भाव) आटा १७५०-१८००, रवा १८००-१८५०, मैदा १८००-१८५०,
बेसन :- (५० किलोस) ५२००-५५०० रु.
मीठ :- मीठ खडे (५० किलोस) २२५, मीठ दळलेले (५० किलोस) २५० रु.
मिरची:- काश्मिरी ढब्बी ३५०००-३८०००, ब्याडगी २००००-२३०००, लवंगी तेजा २००००-२२०००,
गुंटूर १८०००-२००००, खुडवा गंटूर ८०००-९०००, खुडवा ब्याडगी ९०००-१०००० रु.
नारळ :- (शेकड्याचा भाव): नवा पॅकिंग २०००-२२००, मद्रास ३३००-३५००, पालकोल जुना २१००-
२३००, सापसोल ३२००-३५०० रु.





