इराणमध्ये “महागाई’वरून सुरु असलेले आंदोलन भडकले; जाळपोळ, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या, हवेत गोळीबार
Updated On:

तेहरान (इराण) – इराणमध्ये वाढत्या महागाईमुळे देशातील सहा प्रांतांमध्ये लोकांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक शहरांमध्ये हवेत गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किती जण जखमी झाले याची नेमकी आकडेवारी मिळू शकलेली नाही. मात्र हे आंदोलन चिथावणी देण्यासाठी सुरू केले गेले आहे, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
आंदोलकांनी काही ठिकाणी जाळपोळ करायलाही सुरुवात केली आहे, असा आरोप सरकारी वृत्तवाहिन्यांनी केला आहे. या संदर्भात आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे. काही मूलभूत खाद्यपदार्थांच्या अनुदानात कपात करून त्यांच्या किमतीत वाढ करण्यासाठी सरकारने सोमवारी योजना जाहीर केल्यानंतर निदर्शने सुरू झाली.





