महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ; जाणून घ्या नवे दर

CNG And PNG Rate| महागाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजीपाला, पेट्रोल, डिझेल आणि जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. यातच आता सर्वसामान्य नागरिकांना आणखी महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ काल मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. मुंबईत सीएनजी-पीएनजी गॅस पुरवणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.
किती रुपयांंनी झाली वाढ ?
सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाल्याने पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. CNG And PNG Rate|
सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ होण्याचे कारण काय?
उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने त्याच्या तुलनेत ही दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. मुंबईमध्ये अनेक रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालतात. यातच सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. CNG And PNG Rate|
हेही वाचा:





