खटाव तालुक्यात करोनाचा शिरकाव

सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दोन जणांचा करोना रिपोर्ट मंगळवारी सकाळी पाँझिटिव्ह आले. त्यापैकी एक कराडच्या रुग्णालयातील असून दुसरा रुग्ण खटाव तालुक्यातील आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता १२१ झाली आहे.
कराडच्या रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या सहवासातील एक जणाचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला आहे. तर ठाण्यातून खरशिंगे (ता. खटाव) येथील युवकाला करोनाची बाधा झाली आहे.
गेली दीड महिना सातारा जिल्ह्यात करोना बाधितांचा आकडा वाढत असताना खटाव तालुका याला अपवाद होता. मात्र, ठाण्यावरून आलेल्या एला युवकाचा अहवाल करोना बाधित आला आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात करोनाचा शिरकाव झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, खरशिंगे येथील एक युवक ठाणे (नवी मुंबई) येथून गावाला आला होता. त्याची करोना चाचणी केल्यानंतर तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.





