कुख्यात गुंड पवन सोळवंडेची बेछूट गोळ्या झाडून हत्या

कराडात तणावाचे वातावरण

कराड  – कराड येथील कुख्यात गुंड पवन सोळवंडे यांच्या घरात घुसून बेछूट गोळीबार करीत त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात घडला. या घटनेनंतर कराड शहर व परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी पवन याच्यावर बेछूटपणे गोळीबार केला असून त्याच्यावर 5 ते 6 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्लेखोर स्थानिकच असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपासाची चक्रे गतिमान करण्यात आले आहेत. तीन वेगवेगळी तपास पथके तयार करून संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान सोमवारी रात्री मंगळवार पेठेतील बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण याला खंडणी मागून ती न दिल्याने त्याच्या घराच्या परिसरात पवन सोळवंडेेसह अन्य चौघांनी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवली होती. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असतानाच मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने कराडात तणावाचे वातावरण पसरले आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×