वंचित आघाडी, बळीराजासह अपक्षांचा उमेदवारी अर्ज दाखल
सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघातून मंगळवारी वंचित बहुजन आघाडी, बळीराजा शेतकरी संघटनेसह एका अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून सहदेव ऐवळे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी चंद्रकांत खंडाईत, ऍड. राजेंद्र गलांडे, सिद्धार्थ खरात उपस्थित होते. तर बळीराजा शेतकरी संघटनेकडून पंजाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
- उमेदवारी अर्ज दाखल करताना पंजाबराव पाटील व मान्यवर
- अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताना
- उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे व मान्यवर
त्यावेळी बी. जी. पाटील, कॉ. अस्लम तडसरकर, कॉ. विजय पवार, नंदकुमार मोहिते आदी उपस्थित होते. त्याचबरोबर गोडोली, ता. सातारा येथील किशोर धुमाळ यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन न करता साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणे पसंत केले. दरम्यान, उमेदवारी दाखल करण्याचा सोमवार हा चौथा दिवस होता. या दिवसाअखेरपर्यंत सहा अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत अद्याप 4 एप्रिलपर्यंत आहे. त्यामुळे आणखी किती अर्ज दाखल होतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.








