IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडचे भारतासमोर माफक आव्हान, दीप्ती शर्मानं घेतले 3 बळी…

INDW vs NZW 3rd ODI Live Score Updates : आज भारतीय महिला क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 59 धावांनी जिंकला तर दुसरा सामना 76 धावांनी गमावला. हरमनप्रीत कौर ब्रिगेड आता तिसरा एकदिवसीय सामना जिंकून मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल.
तिसऱ्या वनडेत न्यूझीलंडने भारतासमोर 233 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने न्यूझीलंडला 49.5 षटकांत 232 धावांत गुंडाळले.
New Zealand fights back after a shaky start to post a competitive total of 232!
Can India chase it down and seal the series?#CricketTwitter #INDvsNZ pic.twitter.com/jRkavjxbNb
— Female Cricket (@imfemalecricket) October 29, 2024
न्यूझीलंडकडून ब्रुक हॉलीडेने 96 चेंडूत 9 चौकार अन् 3 षटकारांसह सर्वाधिक 86 धावांची खेळी केली तर ली ताहुहू 14 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिली. याव्यतिरिक्त न्यूझीलंडकडून जॉर्जिया प्लिमरने 39, मॅडी ग्रीनने 15, इसाबेला गेजने 25, हॅना रोवेने 11 धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्माने शानदार गोलंदाजी केली. तीने 10 षटकात 39 धावा देत तीन गडी बाद केले. याव्यतिरिक्त 20 वर्षीय प्रिया मिश्राने 10 षटकात 41 धावा देत 2 बळी घेतले. रेणुका ठाकूर सिंग आणि सायमा ठाकोर यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आले.



