Smriti Mandhana : स्मृती मंधाना पुन्हा सुसाट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान शतक ठोकत किंग कोहलीलाही टाकलं मागे

Smriti Mandhana Fastest Century in ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात तिने अवघ्या 50 चेंडूंमध्ये शतक ठोकत भारताकडून सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. यासह तिने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूंमध्ये केलेला विक्रम मोडला. तसेच, स्मृती ही महिला वनडेमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारी जगातील दुसरी महिला फलंदाज ठरली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुफानी खेळी –
ऑस्ट्रेलिया महिला संघाने दिलेल्या 413 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने तिसऱ्या वनडे सामन्यात आपली फलंदाजीची जादू दाखवली. तिने 50 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांसह शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर ती आपली खेळी फार पुढे नेऊ शकली नाही. ती 63 चेंडूंमध्ये 17 चौकार आणि 5 षटकारांसह 125 धावांवर बाद झाली. यापूर्वी दुसऱ्या वनडे सामन्यातही तिने 91 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांसह 117 धावांची शानदार खेळी केली होती.
महिला वनडेमधील दुसरे सर्वात जलद शतक –
When the scoreboard looks scary, number 1️⃣8️⃣ looks scarier. 😈🏏#ViratKohli 🤝 #SmritiMandhana
Watch #INDvAUS 3rd ODI LIVE NOW 👉 https://t.co/9DnugjFCV4 pic.twitter.com/EnHQQH2Fcl
— Star Sports (@StarSportsIndia) September 20, 2025
स्मृती मंधानाने या तुफानी शतकासह महिला वनडेमधील दुसऱ्या सर्वात जलद शतकाचा विक्रम नोंदवला. सर्वात जलद शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगच्या नावावर आहे, जिने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 45 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. या यादीत स्मृती दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने याच सामन्यात 57 चेंडूंमध्ये शतक ठोकत तिसरे स्थान मिळवले.
हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, दुसऱ्यांदा केलं असं कृत्य
वर्षभरात झळकावली चार शतके –
स्मृती मंधानाने 2025 मध्ये वनडेमध्ये आपले चौथे शतक पूर्ण केले. यापूर्वी 2024 मध्येही तिने चार शतके ठोकली होती. एका वर्षात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत ती सलग दोन वर्षे अव्वल स्थानावर आहे. यंदा दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स हिनेही वनडेमध्ये चार शतके ठोकली आहेत. मंधानाच्या या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय महिला क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तिच्या या खेळीने ती जागतिक क्रिकेटमधील एक अव्वल फलंदाज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.





