INDW vs AUSW : भारतीय संघाने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच संघ

INDW vs AUSW Indian Women Team Record : भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करताना नवा विक्रम प्रस्थापित केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यात 300 हून अधिक धावा करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. मात्र, 413 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 47 षटकांत 369 धावांवर सर्वबाद होऊन 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
स्मृती मंधानाने झळकावले वादळी अर्धशतक –
या सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधानाने 63 चेंडूत 125 धावांची शानदार खेळी साकारली. दीप्ती शर्माने 72 धावा, कर्णधार हरमनप्रीत कौरने 52 धावा आणि स्नेह राणाने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारत संघाला 300 धावांचा टप्पा पार करण्यास मदत केली. या कामगिरीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 300 हून अधिक धावा करणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या –
A spirited and solid show with the bat from #TeamIndia 👍 👍
But it was Australia who won the third ODI by 43 runs to win the series!
Scorecard ▶️ https://t.co/epqQHJ5BA5#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zVnF6WzysR
— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. 5 मार्च 2022 रोजी हॅमिल्टन येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने 298/8 धावा केल्या होत्या. भारतीय संघाने 20 सप्टेंबर 2025 रोजी दिल्लीत 369/10 धावांचा विक्रमी स्कोअर उभारला.
- भारत – 369/10 – दिल्ली 2025
- इंग्लंड – 298/8 – हॅमिल्टन – 2022
- भारत – 292/10 – मुल्लांपुर – 2025
- न्यूझीलंड – 288/6 – नॉर्थ सिडनी – 2012
- इंग्लंड – 285/10 – क्राइस्टचर्च – 2022
- इंग्लंड -285/9 – टॉनटन – 2023
हेही वाचा – INDW vs AUSW : विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाची दमदार तयारी, भारताचा २-१ ने धुव्वा उडवत मालिका जिंकली
महिला एकदिवसीय सामन्याच्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या –
भारतीय संघाने या सामन्यात दुसऱ्या डावात 369/10 धावा करत महिला एकदिवसीय सामन्याच्या दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदवला. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता, ज्याने 19 जून 2024 रोजी बंगळुरूत भारताविरुद्ध 321/6 धावा केल्या होत्या.
हेही वाचा – INDW vs AUSW : बेथ मूनीच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास! भारताविरुद्ध नोंदवला खास पराक्रम
ऐतिहासिक कामगिरी –
भारतीय महिला क्रिकेट संघाने या सामन्यात पराभव स्वीकारला असला, तरी 369 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्येचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि इतर फलंदाजांच्या योगदानामुळे भारतीय संघाने क्रिकेटप्रेमींच्या मनात एक अविस्मरणीय ठसा उमटवला.





