INDW vs AUSW : स्मृतीच्या शतकाने भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव!

स्मृती मंधानाने झळकावले वादळी शतक –
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. भारताने स्टार सलामीवीर स्मृती मंधानाच्या वादळी (117) शतकाच्या जोरावर 49.5 षटकांत सर्वबाद 292 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 190 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक 44 धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर भारताकडून क्रांती गौडने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया महिला संघाचा सर्वात मोठा पराभव –
And that’s how it is done 😎 🔥#TeamIndia comprehensively win the 2️⃣nd ODI by 102 runs and level the 3 match series 1️⃣-1️⃣
Scorecard ▶️ https://t.co/64x1QjUHl9#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/lXaEYxrqKq
— BCCI Women (@BCCIWomen) September 17, 2025
विशेष ल म्हणजे ऑस्ट्रेलिया महिला संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला. प्रथमच ऑस्ट्रेलियाला 100 पेक्षा जास्त धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा पराभव 1973 मध्ये इंग्लंडविरुद्ध 92 धावांनी झाला होता. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 8 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आता मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 20 सप्टेंबर रोजी दिल्लीत खेळवला जाणार आहे.
हेही वाचा – UAE vs PAK : पाकिस्तानचा यूटर्न; आशिया कप 2025 मधील UAE सामन्यावरील बहिष्कार मागे
ऑस्ट्रेलिया महिला संघाचे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठे पराभव(धावांच्या फरकाने):
- 102 धावा – भारतविरुद्ध, मुल्लांपुर, 2025
- 92 धावा – इंग्लंडविरुद्ध, एजबेस्टन, 1973
- 88 धावा – भारतविरुद्ध, चेन्नई (एमएसव्ही), 2004
- 84 धावा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, नॉर्थ सिडनी, 2024
- 82 धावा – न्यूझीलंडविरुद्ध, लिंकन, 2008
हेही वाचा – Fake Football Team : अजब पाकिस्तानी गजब कारनामे, जपानला जाण्यासाठी बनवली खोटी फुटबॉल टीम, विमानतळावर अटक!
ऑस्ट्रेलियाचा महिला संघ 190 धावांवर गारद –
भारतीय संघाच्या 293 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियन संघ 40.5 षटकांत 190 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना 102 धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँडने 45 आणि एलिस पेरीने 44 धावा केल्या. भारताकडून क्रांती गौरने प्राणघातक गोलंदाजी केली, 9.5 षटकांत 28 धावांत 3 विकेट्स घेतले. दीप्ती शर्माने 6 षटकांत 24 धावांत 2 विकेट्स घेतले. रेणुका सिंग, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.





