#INDvWI : निर्णायक ‘वन-डे’ सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल

कटक : भारत आणि वेस्टइंडिज मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामन्यात ‘फायनल’चा थरार पहायला मिळणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना विंडीज संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. आजच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघाने एक बदल आहे. दुखापत ग्रस्त दिपक चहरच्या जागी वेगवान नवोदित गोलंदाज नवदीप सैनी याचा संघात समावेश केला आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकुर, कुलदीप यादव आणि नवदीप सैनी.

तर दुसरीकडे विंडिजने संघात कोणताही बदल केला नसून मागील सामन्यातील ११ जणांचा संघ कायम ठेवला आहे.

वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड (कर्णधार), एविन लुईस, शाई होप, शिमरोन हेटमायर, रोस्टन चेज, निकोलस पूरन, जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्जारी जोसेफ, केरी पेयरी, शेल्डन कॉट्रेल.

दरम्यान, गेल्या १५ वर्षात भारतीय संघाने मायदेशात सलग दोन एकदिवसीय मालिका गमावलेल्या नाहीत. हा विक्रम अबाधित राखण्यासाठी आज विंडिजविरूध्द भारताला कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. दुसरीकडे १३ वर्षानंतर भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी विंडीजला आहे. त्यामुळे आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.