#INDvWI 1st ODI : टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने विजय

बारबाडोस :- भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाच विकेट्स राखून जिंकला आहे. रोहित शर्माने चौकार मारून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कुलदीप यादव सामन्याना मानकरी ठरला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 23 षटकांत सर्वबाद अवघ्या 114 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजाने 6 षटकात 37 धावा देत तीन आणि कुलदीप यादवने 3 षटकात 6 धावा देताना सर्वाधिक चार बळी घेतले.
प्रत्युत्तरात भारताने इशान किशनच्या 52 धावांच्या जोरावर पाच विकेट्स गमावत 22.5 षटकांत 118 धावा केल्या आणि सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने दोन, जेडेन सेल्स आणि यानिकने प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारतीय संघाने या सामन्यात गोलंदाजीत चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिजला छोट्या धावसंख्येवर रोखले. मात्र, यानंतर टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच प्रयोग केले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीला येण्याच्या मूडमध्ये नव्हते. ईशान (52) आणि गिलने (07) डावाची सुरुवात केली. सूर्यकुमार (19) तिसऱ्या क्रमांकावर आला. हार्दिक (05) चौथ्या क्रमांकावर तर जडेजा (16*) पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आला. शार्दुलने (01) सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली.
मात्र, भारताचे पाच गडी बाद झाल्याने कर्णधार रोहितला (12*) फलंदाजीला यावं लागलं आणि त्याने चौकार लगावत भारताचा विजय साकार केला.





