चेन्नई – करोनानंतर जवळपास एका वर्षाने देशात क्रिकेटला सुरवात झाली, तरी पहिल्या कसोटीसाठी प्रेक्षकांना परवानगी नव्हती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्रेक्षकांच्या पन्नास टक्के उपस्थितीला मान्यता मिळाली आहे. पण, या गर्दीबरोबर असंख्य प्रश्नांनाही त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. मैदानाच्या क्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना प्रवेश मिळणार असल्याने त्यांच्यासह करोनाही पुन्हा येणार नाही ना अशी भीती आता व्यक्त होत आहे. पहिल्या कसोटीत घरच्याच मैदानावर भारतीय फिरकी निष्प्रभ ठरली. भारताला पराभवाचा सामना करावा लागला. प्रेक्षक नव्हते त्यामुळे खेळाडूंना पराभवाचे फारसे जाणवले नाही. पण, आता प्रेक्षकांसमोर खेळताना भारतीय खेळाडूंना जरा जपून खेळावे लागेल. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढून चाहत्यांना दिलासा देण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहिल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण, प्रेक्षकांच्या उपस्थितीने संयोजक क्रिकेट संघटनेची जबाबदारी वाढणार आहे. करोनाबाबत घेतली जाणारी दक्षता पन्नास टक्के उपस्थिती त्यांच्या सुविधेसाठी स्वयंसेवक राहणार षटकार प्रेक्षकांत गेला की चेंडूचे लगेच सॅनिटायझेशन एक खुर्ची सोडून प्रेक्षक बसणार सीसीटीव्ही पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन व तापमान चाचणी कक्ष मास्क अनिवार्य पाच वैद्यकिय सुविधा केंद्र चार अँब्युलन्सची उपलब्धता विलगीकरणासाठी स्वतंत्र कक्ष