Baaghi 4 trailer : अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ सिनेमाच्या ट्रेलची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. फुल्ल पॅक अॅक्शने भरलेला बागी ४ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांना रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमाची आठवण झाली आहे. याच कारण म्हणजे या ट्रेलरमध्ये अॅनिमल सिनेमातील अॅक्शन सीन्सवर साम्यता दिसून येत आहे. बॅाग ४ मधून पुन्हा एकदा रॅानी अर्थात सर्वांचा लाडका अभिनेता टायगर श्रॅाफ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला घेऊन नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या प्रतिक्रिया संमिश्र स्वरुपाच्या असून काहींनी ट्रेलरच कौतुक केलं आहे, तर काहींनी मोठ्या प्रमाणात दाखविण्यात आलेली हिंसा याबाबत टीका केली आहे. टायगर श्रॉफचे कौतुक करताना एका युजरने लिहिले की, टायगरने येथे अद्भुत काम केले आहे. त्याने त्याचा सर्वोत्तम अभिनय केला आहे. जर त्याला चांगली पटकथा मिळाली तर तो आणखी चांगला काम करू शकतो. दुसऱ्या एका नेटकऱ्यांने ‘बागी ४’ च्या ट्रेलरचे वर्णन भयानक, भावनिक आणि धोकादायक असे केले आहे. WTF What Is this 😐 Vanga saw the first draft of Animal and threw it away and They picked up that draft and made it.. Bollywood is coping from Bollywood 🙏 #Baaghi4 #Baaghi4Trailer pic.twitter.com/7kz0aZgLey — The PK (@punitkanna4) August 30, 2025 अजून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, बागी ४ चा ट्रेलर आवडला नाही. संदीप रेड्डी वांगा यांनी अॅनिमलचा पहिला ड्राफ्ट टाकला असावा, असं म्हणत ट्रेलरची खिल्ली उडवली आहे. हा सिनेमा ५ सप्टेंबर या दिवशी रिलीज होणार असून याच दिवशी द बंगाल फाइल्स हा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित सिनेमा रिलीज होणार आहे. बागी ४ चे दिग्दर्शक ए हर्षा यांनी केलं असून साजिद नाडियादवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हेही वाचा : “पूजा कमी पार्टी जास्त वाटते,”; अर्जुन बिजलानीच्या घरातील व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले