#INDvENG 3rd T20 | इयान मॉर्गनची अनोखी कामगिरी

अहमदाबाद – सलामीवीर जोस बटलर व जॉनी बेअरस्टो यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा तिसऱ्या टी-20 सामन्यात 8 गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.
दरम्यान, भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने एक अनोखी कामगिरी केली. इंग्लंडकडून 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा मॉर्गन पहिलाच क्रिकेटपटू ठरला.
मॉर्गन 100 किंवा त्यापेक्षा जास्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील चौथा खेळाडू ठरला. या यादीत बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा तर, तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा रॉस टेलर आहे.
इंग्लंडकडून सर्वाधिक धावा
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मॉर्गन इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 100 सामन्यांमध्ये 2 हजार 306 धावा केल्या आहेत. त्यात त्याने 14 अर्धशतके फटकावली आहेत. 99 ही त्याची टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.





