#INDvAUS Final : “आपण जिंकलो.. हे शब्द ऐकत नाही तो पर्यंत खोलीत स्वत:ला कोंडून घेणार’; आनंद महिंद्रांची पोस्ट चेर्चेत

#INDvAUS Final : भारतीय क्रिकेट टीम चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (NDvAUS Final) पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सामना पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु आहे. आज दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामन्याला सुरुवात झाली असून, त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला.
नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. कॅप्टन पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरली आहे. दरम्यान, आजच्या फायनलसाठी क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला असून देश-विदेशातील दिग्गज लोकांसह सेलिब्रिटीही मैदानात उपस्थित आहेत. तर मैदानाबाहेरही जबरदस्त माहोल पहायला मिळत आहे.
No, no, I am not planning to watch the match (my service to the nation 🙂) But I will, indeed, be wearing this jersey and installing myself in a hermetically sealed chamber with no contact with the outside world until someone knocks and tells me we’ve won… pic.twitter.com/HhMENqORp1
— anand mahindra (@anandmahindra) November 19, 2023
दरम्यान, अश्यातच उद्योजक आनंद महिंद्रा ( anand mahindra ) मात्र एकांतवासात जाणार आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली आहे. आनंद महिंद्र यांनी टीम इंडियाच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे. या जर्सीवर आनंद असे नाव लिहिले असून 55 हा नंबर लिहिला आहे. यासोबत त्यांनी एक कॅप्शनही शेअर केले आहे.
आनंद महिंद्रांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आजचा क्रिकेटचा सामना पाहणार नसून, ही जर्सी घालून एकांतवासात जाणार आहे. जो पर्यंत ‘आपण जिंकलो’ हे शब्द ऐकत नाही तो पर्यंत एका बंद खोलीत स्वत:ला कोंडून घेणार आहे. टीम इंडिया जिंकावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी हा छोटासा प्रयत्न करत आहे’.
याचाच अर्थ आनंद महिंद्रा सामना सुरू असताना एकांतवासात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भलेही मी स्वत:ला दिवसभरासाठी कोंडून घेणार असलो तरी तुम्ही तुमच्या चाहत्यांचा अनुभव उच्च स्तरावर नेताल, असेही त्यांनी टेक महिंद्राच्या एका ट्विटला उत्तर देताना म्हटले.
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दरम्यान, भारतीय संघाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने तीन वेळा एकदिवसीय विश्वचषक फायनल खेळली. यामध्ये भारताला 2 वेळा विजय आणि एकदा पराभव स्विकारावा लागला.1983 मध्ये, भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे त्याने वेस्ट इंडिजचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले होते.
यानंतर 2003 मध्ये भारत दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारताला ऑस्ट्रेलियाकडून 125 धावांनी पराभव पत्करावा लागला.त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीलंकेला हरवून भारताने 28 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर आज भारत विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.





