#INDvAUS Final : फायनलपूर्वी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला आशीर्वादासह दिल खास गिफ्ट

#INDvAUS Final : भारतीय क्रिकेट टीम चौथ्यांदा वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (NDvAUS Final) पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा सामना पाचवेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु आहे.
टीम इंडियाने 2011 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला हरवलं होतं. त्यानंतर वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
“You make us proud!”🖋
Sachin Tendulkar gifts Virat Kohli his signed jersey ahead of the #CWC23 Final 🫶🥲#INDvAUS pic.twitter.com/ggT6uzJ3fA
— ICC (@ICC) November 19, 2023
दरम्यान, आज सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) विराट कोहलीसोबत (Virat Kohli) मैदानावर दिसला होता. दोन्ही दिग्गज एकमेकांना मिठी मारताना दिसले आणि यादरम्यान सचिनने आपली स्वाक्षरी केलेली खास जर्सी विराटला दिली.
2011च्या विश्वचषक फायनलमध्ये विराट आणि सचिन टीम इंडियाचा एकत्र भाग होते. या विश्वचषक सामन्यात सचिन तेंडुलकर जी जर्सी घालून खेळला होता. आता त्याने तीच जर्सी विराटला खास भेट म्हणून दिली आहे.
सोशल मीडियावर याबद्दल खास पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. फायनलपूर्वी विराट कोहलीला सचिन तेंडुलकरकडून आशीर्वादासह खास गिफ्ट मिळालं असल्याचं यातून दिसून येत आहे.





