इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन : श्रीकांतची लक्ष्यवर मात; सिंधूचा पराभव…
Updated On:

जकार्ता – ऑल इंडिया ड्युएल अशी ओळख निर्माण झालेल्या लढतीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतने आपल्याच देशाच्या लक्ष्य सेनचा पराभव केला. या विजयाच्या जोरावर त्याने येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. कारण दोन भारतीय खेळाडूंमध्येच ही लढत रंगणार होती. श्रीकांतने लक्ष्यच्या सगळ्या योजना अपयशी ठरवताना 21-17, 22-20 असा विजय मिळवला. आजपर्यंत या दोन खेळाडूंमध्ये तीन सामने झाले असून,
हे सर्व सामने श्रीकांतनेच जिंकले आहेत. दुसरीकडे महिलांच्या एकेरीच भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू हिला तैपेयीच्या ताई झू यिंगकडून 21-18, 21-16 असा पराभव पत्करावा लागला.





