Indonesia News : जमावाकडून इंडोनेशियातील प्रादेशिक विधीमंडळ पेटवण्याचा प्रयत्न; 3 जण ठार

जकार्ता : इंडोनेशियातील साऊथ सुलावेसी प्रांताच्याची राजधानी माकास्सरमध्ये प्रांतीय विधीमंडळाची इमारत पेटवण्याचा प्रयत्न जमावाने केला. यावेळी झालेल्या हिंसाचारामध्ये तिघे जण ठार झाले आणि अन्य ५ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी प्रांतीय विधीमंडळाला आग लावण्यात आली. यामुळे या परिसरामध्ये धुराचे लोट उठले होते. शनिवारी सकाळपर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते.
जळालेल्या इमारतीमध्ये तिघांचे मृतदेह सापडले आहेत. तर भाजल्यामुळे जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पैकी काही जणांनी आगीपासून वाचण्यासाठी इमारतीवरून उडी मारली होती. त्यामुळे त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आहेत, असे स्थानिक आपत्ती निवारण अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी पश्चिम जावाच्या बांडुंग शहरातील निदर्शकांनी प्रादेशिक संसदेला देखील आग लावली होती.
परंतु तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. इंडोनेशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या सुराबायामध्ये, निदर्शकांनी कुंपण तोडल्यानंतर आणि वाहने जाळल्यानंतर प्रादेशिक पोलिस मुख्यालयावर हल्ला केला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला आणि पाण्याचे फवारे मारले. परंतु निदर्शकांनी फटाके आणि लाकडी काठ्यांचा वापर करून प्रतिकार केला.
संतप्त निदर्शकांनी जाळलेल्या जळालेल्या गाड्या, पोलिस कार्यालये आणि बस आश्रयस्थाने अधिकाऱ्यांनी साफ केल्याने इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये शनिवारी शांतता पसरली. सोमवारी जकार्तामध्ये पाच दिवसांच्या निदर्शनांना सुरुवात झालीय या निदर्शनांची सुरुवात सर्व ५८० लोकप्रतिनिधींना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त ५० दशलक्ष रुपया (३,०७५ अमेरिकन डॉलर) मासिक गृहनिर्माण भत्ता मिळत असल्याच्या वृत्तामुळे झाली. बहुतेक सामान्य लोक वाढती महागाई, करांमुळे आणि वाढत्या बेरोजगारीमुळे त्रस्त असताना लोकप्रतिनिधींना देण्यात आलेला हा नवीन भत्ता केवळ अतिरेकीच नाही तर असंवेदनशील देखील आहे, असा दावा टीकाकार करत आहेत.
अफान कुर्नियावानच्या या २१ वर्षीय राईड-हेलिंग चालकाच्या मृत्यूनंतर निदर्शने व्यापक आणि अधिक हिंसक झाली. जकार्तामधील रॅलीदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांचे भरधाव वाहन गर्दीमध्ये घुसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सोशल मीडियावरच्या व्हिडीओमध्ये दिसले होते. त्यामुळे सुरक्षादलांविरोधात सताप व्यक्त होऊ लागला होता.





