भारत-अमेरिका व्यापार कराराला ‘खो’ ; दोन्ही देशात कोणताही करार नाही, नेमकं काय बिनसलं ? वाचा

Indo-US trade agreement । भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबद्दल मोठी बातमी आहे. दोन्ही देशांमध्ये अद्याप टॅरिफबाबत कोणताही करार झालेला नाही, सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिका १० टक्के कर कायम ठेवण्यास उत्सुक आहे तर भारताला अनेक क्षेत्रांमध्ये लादलेला १० टक्के कर शून्यावर आणायचा आहे ” या भारताच्या धोरणामुळे सध्या तरी कोणताही करार झाला नसल्याचे म्हटले जात आहे. Indo-US trade agreement ।
दरम्यान, अशा परिस्थितीत, दोन्ही देशांमधील मतभेद पाहून, भारताच्या वतीने या कराराचे मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांनी आपला अमेरिका दौरा आणखी वाढवला आहे असे म्हणत यावर आणखी चर्चा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराच्या अटींबाबत एक करार झाला आहे आणि तो ८ जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो असे वृत्त समोर आले होते. यानंतर, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चांगल्या संबंधांचा हवाला देत म्हटले होते की दोघांमधील संबंध चांगले राहतील” असे म्हटले होते.
लेविट म्हणाले होते की,” भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार जवळ आला आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच त्याबद्दल अपडेट देतील.” दरम्यान , सध्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहतील.Indo-US trade agreement ।
२ जुलै रोजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर परस्पर शुल्क लादले. पण टॅरिफवरून झालेल्या गोंधळानंतर अमेरिकेने अनेक देशांना त्यातून तात्पुरती सवलत दिली होती. अमेरिकेने भारतावर लादलेला २६ टक्के परस्पर कर ९ जुलैपर्यंत स्थगित केला होता. परंतु भारतावरील १० टक्के बेसलाइन कर रद्द करण्यात आला नाही.





