भारत-अमेरिका सहकार्य अनेक पटींनी सामर्थ्य वाढवेल; संरक्षण मत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास

नवी दिल्ली – अमेरिकेचे भांडवल आणि तंत्रज्ञानाची माहिती भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करू शकते, तर इथली गुंतवणूक अमेरिकन कंपन्यांना उच्च परतावा आणि जोखीम कमी करण्याचा मार्ग प्रशस्त करू शकते , असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. नवी दिल्लीत 30 जानेवारी 2024 रोजी आयोजित इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने (आयएसीसी ) आयोजित केलेल्या ‘अमृत काळ – आत्मनिर्भर भारतामध्ये भारत-अमेरिका संबंध बळकट करणे’ याविषयावरील परिषदेला ते संबोधित करत होते.
सरकारने सशक्त आणि आत्मनिर्भर ‘नव्या भारताचा ’ पाया रचला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला साकार करण्यासाठी अमेरिकन गुंतवणूक महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे राजनाथ सिंह म्हणाले.
दोन्ही देशांसाठी ही लाभदायक स्थिती आहे असे सांगत, भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, त्याचा लोकसंख्या लाभांश, कुशल कामगार आणि प्रचंड देशांतर्गत बाजारपेठ हे घटक अमेरिकी कंपन्यांना उच्च परताव्याची हमी देतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आणि धोरणात्मक स्वायत्तता राखण्यासाठी अमेरिकन व्यवसायांना भारतात गुंतवणूक करून जोखीम कमी करणे आवश्यक असेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगत या दोन्ही देशांनी सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीमध्ये व्यवसाय आणि सामरिक या दोन्ही क्षेत्रात एकत्र वाटचाल करणे आवश्यक आहे असे राजनाथ सिंह म्हणाले. “भारत आणि अमेरिका मुक्त, खुल्या आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे समर्थन करतात. यामुळे, आमच्या धोरणात्मक हितसंबंधांमध्ये बरीच समानता आहे.
याशिवाय, आमचे आर्थिक संबंध दोन्ही देशांसाठी लाभदायक अशा स्थितीत असून उभय देशांमधले वर्तमान संबंध सामायिक मूल्ये आणि सामान हितसंबंधांच्या दुहेरी समरूपतेवर आधारलेले आहेत ही हे संबंध दीर्घकाळ टिकून राहण्याची आणि दृढ करण्याची हमी आहे,”असे त्यांनी सांगितले.





