मुंबईचे राजे संघाने चेन्नई चॅलेंजर्सला रोखले बरोबरीत

मुंबई  – चांगल्या सुरुवातीनंतर देखील मुंबई चे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्स विरुद्धचा आपला तिसरा सामना 34-34 असा बरोबरीत राखण्यात यश मिळवले.

दोन चढाईनंतर दिलजितने मुंबई चे राजे संघासाठी गुणांचे खाते उघडले.पण, चेन्नईच्या संघाने गुणांची कमाई करत सामन्यात लवकरच 2-1 अशी आघाडी घेतली. मुंबई चे राजे संघाच्या बचावफळीने चांगली कामगिरी केली त्यांना चढाईपटूंनी देखील साथ दिल्याने मुंबईने 6-3 अशी आघाडी घेतली. दिलजित व करमबीर यांच्या चांगल्या खेळामुळे मुंबईच्या संघाने पहिल्या क्वॉर्टरमध्ये 8-5 अशी आघाडी घेतली.

चेन्नई चॅलेंजर्स संघाने सुपर टॅकल करत दोन गुणांची व चढाई देखील दोन गुण मिळवत पुन्हा एकदा 11-9 अशी आघाडी घेतली. करमबीरने मुंबई चे राजे संघासाठी गुणांची कमाई करत संघाला 15-13 अशी आघाडी मिळवून दिली. मुंबईच्या संघाने आणखीन एका गुणाची कमाई करत दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये 16-13 अशी आघाडी घेतली.

मुंबई चे राजे चांगली कामगिरी करत असताना चेन्नई संघाने करमबीरच्या चुकीच्या चढाईचा फायदा उचलला व दोन गुणांच्या कमाईसह सामना 19-19 असा बरोबरीत आणला.यानंतर मुंबई चे राजे संघाने तीन मिनिटाहुन अधिकच्या काळात प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करत तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये 24-20 अशी आघाडी घेतली. मनवीरा कांथाने मुंबई चे राजे संघासाठी यानंतर चार गुण मिळवत तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 28-21 अशी आघाडी घेतली.

यानंतर मनवीराने दोन आणखीन गुणांची कमाई करत पाच मिनिटे शिल्लक असताना संघाला 31-25 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे सामना मुंबईच्या बाजूने झुकेल असे वाटत होते. यानंतर चेन्नई चॅलेंजर्स संघाने मुंबईवर दबाव टाकण्यास सुरुवात केली व दोन सलग गुण मिळवत चेन्नईने आघाडी 28-31 अशी कमी केली. एक मिनिटाहून कमी वेळ असताना सामना 34-33 असा मुंबई चे राजे संघाच्या बाजूने होता. यानंतर मनवीराला डु ऑर डाय रेडमध्ये गुण मिळवता न आल्याने चेन्नईला सामना 34-34 असा बरोबरीत राखण्यात यश मिळाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)