Miami Open 2024 : भारताचा टेनिसस्टार ‘सुमीत नागल’ची विजयी सलामी…
Updated On:

Miami Open 2024 – भारताचा टेनिसस्टार सुमीत नागल याने मायामी टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याने या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होताना हे यश मिळवले. त्याने पहिल्या फेरीत कॅनडाच्या गॅब्रीयल दीयालोचा ७-६, ६-२ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.
नागलने गेल्या आठवड्यात चेन्नई ओपन स्पर्धा जिंकत जागतिक टेनिस क्मवारीत पहिल्या १०० खेळाडूंत स्थान मिळवले. तो सध्या या क्रमवारीत ९२ व्या स्थानावर आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/deepika-kumari-tops-indias-selection-trials-for-archery-world-cup-and-paris-2024-olympics/
गेल्या दोन दिवसांपूर्वीच इंडियन वेल्स स्पर्धेत त्याला मिलोस रॉनीककडून पराभव पत्करावा लागल्याने मुख्य फेरीत प्रवेश करता आला नव्हता. मात्र, त्याने ही कसर मायामी स्पर्धेत भरून काढली.





