#ENGvIND ODI Series : दुखापतीमुळे ‘हा’ प्रमुख फलंदाज घेणार माघार..?

लंडन – भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय लढतीत खेळता आले नाही . त्याच्या मांडीचे स्नायू दुखावल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यावर उपचार करुन घेण्यासाठी कोहली लंडनमध्येच थांबला असून तो संघासह पहिल्या सामन्यासाठी दाखल झाला नाही.
सातत्याने अपयश येत असल्याने कोहलीला संघातून वगळण्याची मागणी जरी सातत्याने होत असली तरीही निवड समिती त्याला पुरेशी संधी देण्याच्या विचारात असल्याचेही सांगितले जात आहे.
टी-20 सामन्यांच्या मालिकेतही त्याला चमक दाखवता आली नव्हती. त्यातच इग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी ओव्हल मैदानावर झाला. त्यात दुखापतीमुळे कोहलीला खेळता आले नाही. आता त्याच्या दुखापतीबाबत वैद्यकीय अहवाल आल्यावरच तो पुढील सामने खेळणार का ते कळणार आहे.





