निज्जरसाठी मौन पाळणाऱ्या कॅनडाला भारताचे उत्तर
Updated On:

नवी दिल्ली – खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याचे स्मरण करत कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. कॅनडाच्या या कृतीला आज भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने उत्तर दिले आहे.
कट्टरपंथी, हिंसेची वकिली करणाऱ्यांना अशा प्रकारे राजकीय स्थान देण्याच्या कोणत्याही पावलाचा आम्ही स्वाभाविकपणे विरोधच करतो असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.
यापूर्वी १९८५ मध्ये भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान खलिस्तानी दहशतवाद्यांनी उडवले होते. त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे स्मरण करत कॅनडाचे नाव न घेता भारताने म्हटले की दहशतवादाचा कसा बिमोड करायचा हे भारताला चांगले ठाऊक आहे.
ही समस्या संपुष्टात आणणाऱ्यांमध्ये भारतच सगळ्यांत पुढे आहे. या जागतिक आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही देशांसोबत काम करत आहोत.





