पुण्यातला केतन युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसह बसने निघाला रोमानिया बॉर्डरकडे
Updated On:

नवी दिल्ली – युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या भारतीय नागरीकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने तातडीने प्रयत्न करावे, असं आवाहन करण्यात आलं होतं. त्या दृष्टीने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तयारी सुरू केली आहे. मात्र एअरपोर्ट बंद असल्याने विद्यार्थ्यांना भारतात येण्यासाठी अडचण होत आहे.
दरम्यान या अडचणीवर मात करण्यासाठी विद्यार्थी भारतीय दुतावासाच्या मदतीने बस करून रोमानियाच्या बॉर्डरकडे निघाले आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील केतन दरेकरने या संदर्भात “डिजीटल प्रभात”ला माहिती दिली. केतन मेडीकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.
केतन बरोबर अनेक विद्यार्थी विनीतशिया शहरामध्ये शिक्षणं घेत आहेत ते सर्व बस करून रोमानियाला निघाले आहेत. बस करून रोमानियाकडे जातानाचे फोटो केतनने शेअर केले आहे.






