२६१ शीखांचा पाकिस्तान दौरा ; आधी नकार, मग व्हिसा ; नेमकं कारण काय?

Indian Sikh Pilgrimage got PAK Visa । बैसाखीच्या शुभ प्रसंगी जम्मूहून २६१ शीख यात्रेकरूंचा समूह ऐतिहासिक गुरुद्वारांच्या दर्शनासाठी पाकिस्तानात जाण्यासाठी अमृतसरला रवाना झाला. या गटात जम्मू आणि काश्मीरमधील २६१ भाविकांचा समावेश असून, यंदा प्रथमच पाकिस्तानने या सर्व शीख भाविकांचे व्हिसा अर्ज मंजूर केले आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील सर्व यात्रेकरूंना व्हिसा मिळाला नव्हता.
यात्रेकरू ऐतिहासिक गुरुद्वारांना भेट देणार
खालसा पंथाच्या स्थापना दिनी साजऱ्या होणाऱ्या बैसाखीला हे भाविक पाकिस्तानातील गुरुद्वारा करतारपूर साहिब, गुरुद्वारा पंजा साहिब, गुरुद्वारा डेरा साहिब, गुरुद्वारा नानकाना साहिब आणि इतर ऐतिहासिक गुरुद्वारांना भेट देतील.
श्री गुरू नानक देव जी यांचा प्रकाशोत्सव, श्री गुरू अर्जन देव जी यांचा शहादत दिन आणि बैसाखीच्या निमित्ताने शीख भाविकांना पाकिस्तानातील पवित्र स्थळांना भेट देण्याची संधी मिळते. मात्र, अनेकदा व्हिसा न मिळाल्याने भाविकांना निराशा सहन करावी लागते. यंदा मात्र, बैसाखीच्या निमित्ताने जम्मू-काश्मीरमधील सर्व २६१ भाविकांना ही संधी मिळाली आहे.
वाघा सीमेवरून पाकिस्तानात प्रवेश Indian Sikh Pilgrimage got PAK Visa ।
दोन दिवसापूर्वी या यात्रेकरूंना पाकिस्तानच्या व्हिसासह पासपोर्ट मिळाले. जम्मूतील गांधी नगर येथील गुरुद्वारा बाबा फतेह सिंह येथे सर्व अर्जदारांना हे पासपोर्ट वितरित करण्यात आले. त्यानंतर, काल रात्री ९ वाजता हा शीख यात्रेकरूंचा गट जम्मूहून अमृतसरला रवाना झाला. आज हा गट अमृतसरमार्गे वाघा सीमेवरून पाकिस्तानात प्रवेश करणार आहे. पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरुद्वारांना भेट देण्यासाठी हा गट सुमारे १२ दिवस तिथे राहील आणि नंतर भारतात परत येणार आहे.
हेही वाचा
“वक्फ कायदा मुस्लिमांसाठी फायदेशीर, मशिदी-मदरसे सुरक्षित” ; ‘या’ मुस्लिम नेत्याचे वक्तव्य





