Indian rupee’s record low: युद्धाचा भारताला आर्थिक फटका; रुपया गडगडला, महागाई वाढण्याचा धोका
Indian rupee’s record low: रुपयाचा भाव बुधवारी 67 पैशांनी कोसळून 92.16 प्रती डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. सोमवारी रुपयाचा भाव 41 पैशांनी कोसळला होता. त्यामुळे दोनच दिवसात रुपयाचे एक टक्क्याने अवमूल्यन झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घसरण कधी थांबेल याची शाश्वती नाही.

Indian rupee’s record low: भारताला युद्धामुळे खनिज तेल आणि इतर वस्तूंची आयात महागात पडणार आहे. अशा परिस्थितीत आयातदारांनी डॉलरची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे रुपयाचा भाव बुधवारी 67 पैशांनी कोसळून 92.16 प्रती डॉलर या ऐतिहासिक निचांकी पातळीवर गेला. सोमवारी रुपयाचा भाव 41 पैशांनी कोसळला होता. त्यामुळे दोनच दिवसात रुपयाचे एक टक्क्याने अवमूल्यन झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ही घसरण कधी थांबेल याची शाश्वती नाही.
भारत आपल्या गरजेच्या 85% खनिज तेल आयात करतो. तेलाच्या किमतीत दोनच दिवसात मोठ्या प्रमाणात वाढून सध्या 83 डॉलर प्रती पिंपळावर गेल्या आहेत. विशेष म्हणजे या महाग खनिज तेलाच्या उपलब्धतेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत भारतात इंधन महाग होऊन महागाई वाढण्याचा धोका आहे. याचा रुपयांच्या मूल्यावर परिणाम होणे अपेक्षित आहे. सुदैवाने रिझर्व बँकेकडे सातशे अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी आहे. त्यामुळे लघु पल्ल्यात तरी भारतासमोर परकीय चलनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार नाही.
महागाईमुळे भारताच्या सध्याच्या सकारात्मक स्थूल अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. महागाई वाढणार असल्यामुळे भारतीय कर्जरोख्यातील गुंतवणूक कमी होत असून कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्याचे दिसून येत आहे. डॉलर आणखी महाग होईल या शक्यतेमुळे आयातदार डॉलरची मागणी करीत आहेत. त्यामुळे डॉलरचा भाव सध्या तीन महिन्याच्या उच्चांकावर गेला आहे.
जागतिक सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स पंधरा दिवसापूर्वी 96 अंकावर होता. तो आता 98.82 अंकावर गेला आहे. यावरून देश- विदेशात डॉलरची मागणी किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे याचा अंदाज येतो. शेअर बाजार आणि सरकारी रोख्यातील गुंतवणूक कमी होऊन डॉलर आणि सोने- चांदीमध्ये होत असल्याचे चित्र बाजारात आहे.





