ISSF Junior World Cup : रश्मिका-कपिलची कमाल! ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदकाची लयलूट

रश्मिका आणि कपिल यांच्या जोडीने भारताच्या वंशिका चौधरी आणि अँटनी जोनाथन गॅविन या जोडीला १६-१० असे पराभूत केले. इनेस ओर्टेगा कॅस्ट्रो आणि लुकास सांचेझ या स्पेनच्या जोडीने पेरिमा अमीरी मोहम्मद रेझा अहमदी या इराणी जोडीला १६-१४ असे पराभूत करून कांस्यपदक जिंकले.
रश्मिका आणि कपिलने गाजवले वर्चस्व –
रश्मिका आणि कपिलने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत पात्रता फेरीत ५८२ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. दोघांनीही प्रत्येकी २९१ गुण मिळवले. वंशिका आणि गॅविनची जोडी अनुक्रमे एकूण ५७८ गुणांसह अंतिम फेरीत पोहोचली. एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत, पात्रता फेरीनंतरच्या पहिल्या दोन जोड्या सुवर्णपदकासाठी एकमेकांना आव्हान देतात, तर पुढील दोन जोड्या कांस्यपदकासाठी आव्हान देतात.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : यूथ वनडेत वैभव सूर्यवंशीचा नवा पराक्रम; बाबर आझमला मागे टाकत रचला इतिहास!
अंतिम सामना देखील एकतर्फी होता. रश्मिका आणि कपिलने सुरुवातीला आघाडी घेतली आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमन करू दिले नाही. शुक्रवारी पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत विजेतेपद जिंकणाऱ्या गॅविनने अनेक चुका केल्या. त्याने ९.९ नंतर १०.५ आणि १०.६ गुण मिळवले, परंतु त्यानंतर सलग तीन प्रयत्नांमध्ये फक्त ९.७, ९.८ आणि ९.५ गुण मिळवू शकला. वंशिकाला नऊपेक्षा कमी तीन शॉटही लागले, ज्यामुळे जोडीला सुवर्णपदक गमवावे लागले.
हेही वाचा – Suryakumar Yadav : सूर्याने जिंकली चाहत्यांची मनं, वडील गमावलेल्या श्रीलंकन खेळाडूला दिला धीर, पाहा VIDEO
ज्युनियर पुरुषांच्या स्कीटमध्ये हुकले पदक –
पुरुष गटाच्या स्कीटमध्ये भारताचे पदक थोडक्यात हुकले. अंतिम स्पर्धेत भारताचे हरमेहर सिंग लाली आणि अतुल सिंग राजावत पोहोचले होते. मात्र अंतिम फेरीत हरमेहर सिंग लालीला 35 गुणांसह चौथ्या तर अतुल सिंग राजावतला 25 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीच्या मार्को कोकोने ५६ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. फिनलंडच्या लॅसी मॅटियास कोप्पिनेनने ५३ गुणांसह रौप्य तर सायप्रसच्या अँड्रियास पोंटिकिसने ४३ गुणांसह कांस्यपदक मिळवले. भारत सध्या तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण नऊ पदकांसह पदकांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.





