Paralympic Committee Suspension : भारतीय पॅरालिम्पिक समितीचे निलंबन रद्द, क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय…

Paralympic Committee Suspension – क्रीडा मंत्रालयाने पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियावर (पीसीआय) लादलेले निलंबन मागे घेतले. पॅरालिम्पिक पदक विजेता देवेंद्र झाझरिया यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंत्रालयाचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
खरेतर, समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेमुळे मंत्रालयाने गेल्या महिन्यात पीसीआयला निलंबित करण्याचे आदेश दिले होते. हे संविधान आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या क्रीडा संहितेचे उल्लंघन असल्याचे मंत्रालयाने म्हटले होते.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ind-vs-eng-5th-test-england-scored-218-runs-in-the-first-innings-kuldeep-took-five-wickets/
क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयानुसार पीसीआयने कार्यकारणीचा कार्यकाळ संपण्याच्या किमान एक महिना आधी निवडणुका घेणे अनिवार्य असते. मात्र, २८ मार्च २०२४ रोजी पीसीआयने आपली निवडणुक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता क्रीडामंत्रालयाने निलंबन मागे घेतल्याने पीसीआयचा निवडणुक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





