Team India : भारताच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाच्या घोट्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, इंस्टाग्राम पोस्टव्दारे दिली माहिती…

Indian pace bowler Tushar Deshpande :- दुलीप ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडलेला भारतीय संघाचा आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे याच्या घोट्यावर (ankle surgery in London) लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने मंगळवारी सोशल मीडिया पोस्टव्दारे या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे.
This post comes as an update about my ankle surgery which was done yesterday and went very well. It is a great relief as I was dealing with it for quite a long time.
Thank you to all the well wishers for love, trust and support
जय बजरंग बली🙏🏻 pic.twitter.com/eCYAEWZnGg— Tushar Deshpnde (@TusharD_24) October 1, 2024
त्याला आगामी रणजी स्पर्धेतील संभाव्य संघातून याच दुखापतीमुळे वगळण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याचे देशपांडेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले असून चाहत्यांनी दाखविलेल्या विश्वासासाठी त्याने पोस्टच्या माध्यमातून आभार मानले आहेत.
मागील वर्षी झालेल्या रणजी करंडक स्पर्धेत तुषार देशपांडे मुंबईकडून खेळताना 15गडी बाद करताना मुंबईला 43 वर्षांनंतर विजेतेपद मिळवून दिले होते. 11 ऑक्टोबरपासून मुंबई – बडोदा दम्यान लढतीला सुरुवात होणार आहे.




