Virat Kohli : कोहलीची आक्रमक शैली हेच त्याच्या यशाचे रहस्य…!, माजी खेळाडूने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर

Virat Kohli’s anger is the secret of his success : विराट कोहली सहसा मैदानावर आक्रमक शैली दिसतो. विशेष म्हणजे त्याच्या चाहत्यांनाही त्याची ही शैली आवडते. विराटच्या या शैलीमुळे बरेच लोक त्याच्या टीका करतात. मात्र, माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतचे या बाबतीत वेगळे मत आहे. त्यांनी म्हटले आहे की कोहलीची आक्रमक शैली हे त्याच्या यशाचे रहस्य आहे.
श्रीसंत विराटबद्दल काय म्हणाला?
भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंतने विराट कोहलीच्या मैदानावरील आक्रमक शैलीचे समर्थन केले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या पदमजीत सेहरावतच्या पॉडकॅस्टमध्ये श्रीसंत म्हणाला, ‘लोक ज्याला आक्रमकता समजतात, तो माझ्यासाठी जोश आहे.’ यानंतर त्याला विचारले विराट आक्रमक आहे का? यावर श्रीसंत म्हणाला, ‘नाही. त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. जर त्याने हा जोश कमी केला, तर तो पुन्हा तोच खेळाडू राहणार नाही.’ या वक्तव्याद्वारे श्रीसंतने कोहलीच्या टीकाकारांना सणसणीत उत्तर दिले आहे.
“Is Virat Kohli aggressive? No. I think he is obsessed” : S Sreesanth
“What others call aggression, I call it passion. Is Virat Kohli aggressive? No. I think he is obsessed. Virat’s aggression, people say, is a lot. I would say if he reduces that aggression, he won’t be the same… pic.twitter.com/3zx4oFfDxK
— Cricket.com (@weRcricket) August 15, 2025
कोहलीचे मैदानावर कधी होणार पुनरागमन?
विराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर दिसला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो खेळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्याने निवड प्रक्रियेपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता कोहली फक्त एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका होणार असून, यामध्ये कोहली खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Ravi Shastri : रिंकू-यशस्वी नव्हे तर ‘हा’ खेळाडू आहे भारताचा उदयोन्मुख तारा, रवी शास्त्रींचे वक्तव्य
वनडे मालिकेसाठी कोहलीची तयारी सुरु –
Virat Kohli has liked this post on Insta 👀 He’s surely preparing for the upcoming series . pic.twitter.com/JIwFm6lW67
— Sohel. (@SohelVkf) August 13, 2025
विराट कोहलीच्या एका चाहत्याने इन्स्टाच्या फॅन्स पेजवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये कोहली गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक नईम अमिन यांच्यासोबत दिसत आहेत. कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. कोहलीने या पोस्टला लाईक केल्याने चाहत्यांना संकेत मिळाले आहेत की तो ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पुनरागमन करून भारतीय एकदिवसीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे.





