Japan Open 2022 : स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात

टोकियो – जपान ओपन 2022च्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयला पराभव पत्कारावा लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. (India’s challenge at Japan Open ends with Srikanth’s loss) चीनच्या चाऊ तिएन चेनकडून प्रणॉयला पराभव स्वीकारावा लागला. एक तास 20 मिनिटं रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रणॉयचा 21-17, 15-21, 22-20 असा फरकाने पराभव झाला.
एचएस प्रणॉयने गुरुवारी सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लो कीन येववर दोन गेममध्ये एकतर्फी विजयाची नोंद करीत जपान ओपनच्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी मागील दोन लढतींमध्ये चाऊवर विजय मिळवणाऱ्या प्रणॉयने सुरुवातीच्या गेममध्ये वर्चस्व राखले. एकावेळी तो 12-8ने आघाडीवर होता. मात्र, चाऊने प्रणॉयच्या चुकांचा फायदा घेत 15-14 अशी आघाडी घेतली. प्रणॉयने पुन्हा चाऊच्या बॅकहॅंडला नेटवर खेळला. ज्यामुळे चाऊच्या खात्यात तीन पॉईंट्स जमा झाले. चाऊनं सेट क्रॉस कोर्ट रिटर्नसह हा सेट जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येही चाऊने 5-4 अशी माफक आघाडी घेतली. वारंवार झालेल्या चुकांमुळे 6-10 अशा पिछाडीवर गेलेल्या प्रणॉयला त्याच्या आक्रमक वृत्तीचा फटका बसला. पण येथे प्रणॉयला त्याच्या निशिबाची साथ मिळाली आणि त्याने 10-10 अशी बरोबरी साधली. चाऊ इंटरवलपर्यंत आघाडीवर होता. त्यानंतर प्रणॉयने कमबॅक करत दुसरा सेट जिंकत सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये प्रणॉयची सुरुवात खराब झाली. ज्याचा फायदा घेऊन चाऊने तिसरा सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केला. आता अंतिम फेरीतील स्थानासाठी चाऊचा सामना शनिवारी वाय. क्यू. शी याच्याशी होणार आहे.





