Tokyo Olympics : आश्वासक भवानीची तलवार झाली म्यान
Updated On:

टोकियो – भारताची तलवारबाजीतील अव्वल खेळाडू भवानी देवीने महिलांच्या तलवारबाजीत एकेरी गटात पहिल्या विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतरच्या फेरीत तीला पराभवाचा सामना करावा लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
भवानीने पहिल्या फेरीच्या लढतीत अत्यंत आश्वासक कामगिरी केली मात्र, कामगिरीत सातत्य राखण्यात ती अपयशी ठरली.
पहिल्या सामन्यात भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा 15-3 असा पराभव केला. भवानी देवीने हा सामना केवळ सहा मिनिटांत जिंकला व प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिले होते.
त्यानंतर मात्र, भवानी देवीला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या फ्रान्सच्या मॅनॉन ब्रुनेटविरुद्धच्या सामन्यात 15-7 असा पराभव पत्करावा लागला.





