ICC Women’s ODI Rankings : मिताली, स्मृतीची क्रमवारी कायम
Updated On:

दुबई – आयसीसीने विश्वकरंडक क्रिकेच स्पर्धेपूर्वी महिलांची क्रमवारी जाहिर केली आहे. त्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राज व स्मृती मानधना यांनी आपले स्थान कायम राखले आहे. मिताली दुसऱ्या, तर मानधना आठव्या स्थानावर कायम राहिली आहे.
या क्रमवारीत टॉप-10 मध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असून पहिल्या स्थानावर ऍलिसा हिली कायम आहे. तसेच टॉप-10मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. हिलीचे 749 रेटिंग गुण आहेत. त्यानंतर मिताली 735 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
भारताची स्मृती मानधना 666 गुणांसह आठव्या स्थानी आहे. अष्टपैलू महिला खेळाडूंच्या यादीत ऍलिसा पेरी 438 गुणांसह अव्वलस्थानी आहे. या यादीत दीप्ती शर्मा एका स्थानाने घसरण झाली असून तिचे 309 रेटिंग गुण आहेत.





