CWG Boxing Medals : ग्लास्गोच्या रिंगमध्ये ‘पंच’चा धमाका! साक्षी अन् अरुंधतीची धडाकेबाज कामगिरी; भारताची ३ पदके पक्की
CWG Boxing Medals : साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून भारतासाठी आणखी तीन पदके निश्चित केली आहेत.

Sakshi Choudhary Arundhati Choudhary Sachin Siwach CWG 2026 Boxing Medals Confirm : स्कॉटलंडमधील ग्लास्गो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Glasgow Commonwealth Games 2026) भारतीय बॉक्सर्सनी आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. बुधवारी झालेल्या उपउपांत्य (Quarter-Final) सामन्यांमध्ये विजय मिळवत साक्षी चौधरी, अरुंधती चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असून भारतासाठी आणखी तीन पदके निश्चित केली आहेत.
साक्षी अन् अरुंधतीचा धुमाकूळ –
महिलांच्या ५१ किलो वजनी गटात २६ वर्षीय साक्षी चौधरीने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत उत्तर आयर्लंडच्या कॅटलीन फ्रायर्सचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. साक्षीच्या उत्तम फुटवर्क आणि पंचिंग रेंजसमोर प्रतिस्पर्धी खेळाडू निष्प्रभ ठरली. तर ७० किलो वजनी गटात अरुंधती चौधरीने न्यूझीलंडच्या मॉर्गन हेंडरसनचा ३-१ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
A CLASS WIN FOR SAKSHI
She is now in Semis of CWG 2026
pic.twitter.com/qhERwyAMKg https://t.co/vsQ7DgkJUz
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) July 29, 2026
सचिन सिवाच अन् जादुमणि सिंहची बाजी –
Medal assured by Ankush! 🥊
Ankush Panghal cruises into the semis after a commanding 5-0 victory in Men’s 80kg Boxing Quarter-finals! 🤩
Watch the Commonwealth Games Glasgow 2026 LIVE & EXCLUSIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/dZGoQpZxl8
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 29, 2026
Havildar Jadumani Singh of Army going great guns, confirms a medal for India in Men’s 55kg Boxing! #CWG pic.twitter.com/pxKWt5ITQ1
— Rajat Pandit (@IamRajat_Pandit) July 29, 2026
पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात माजी जागतिक युवा विजेता सचिन सिवाच याने बोत्सवानाच्या ट्रेझर मोरेमीचा ५-० असा पराभव करत किमान कांस्यपदक पक्के केले. तसेच ५५ किलो वजनी गटात जादुमणि सिंहने झांबियाच्या म्वेंगो म्वालेवर ५-० असा विजय मिळवला. तर महिलांच्या ६० किलो गटात प्रिया घनघसने स्कॉटलंडच्या नियाम मिशेलचा ४-१ असा पराभव केला. मात्र, ६५ किलो गटात परवीन हुड्डाला ३-२ ने तर आदित्य प्रताप यादवला २-३ ने पराभवाचा सामना करावा लागला.
भारताची पदकांची संख्या १२ वर –
That boxing session was a 5/5 🌟🇮🇳
All five of our boxers powered into their respective semi-finals, guaranteeing #TeamIndia at least five more medals. 💙
🥊 Sakshi Choudhary – Women’s 51kg
🥊 Parveen Hooda – Women’s 65kg
🥊 Arundhati Choudhary – Women’s 70kg
🥊 Sachin Siwach –… pic.twitter.com/TYIQcnieXR— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2026
भारतीय बॉक्सिंग पथकातून आतापर्यंत लवलीना बोरगोहेन, साक्षी, अरुंधती, प्रिया, प्रीती पवार, सचिन सिवाच आणि जादुमणि सिंह यांनी पदके पक्की केली आहेत. या पदकांसह ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची एकूण पदकसंख्या १२ (२ सुवर्ण, ७ रौप्य आणि ३ कांस्य) वर पोहोचली आहे.





