#T20WorldCup | भारतीय फलंदाज पॉवरप्लेमध्ये अपयशी – गावसकर
Updated On:

दुबई – पॉवरप्लेमध्ये भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने धावा करणे गरजेचे होते तसे घडले नाही. एकेकाळी आपण या पहिल्या सहा षटकांत आक्रमक फलंदाजी करत होतो मात्र, या स्पर्धेत तसे चित्र दिसले नाही.
पॉवरप्लेमध्ये दोनच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात त्याचा लाभ घेण्यात आपण कमी पडलो व त्यामुळेच पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही.तसेच या स्पर्धेत आपली संघ निवडची चुकली.
एका पराभवानंतर लगेचच मोठे बदल केले जाणेही संघासाठी नुकसान ठरते, असे मत विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.





