बेंगळुरू :- भारत 30 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता एकाच वेळी सात उपग्रह सिंगापुरहून प्रक्षेपित करणार आहे. यात डीएस-एसएआर हा एक महत्वाचा उपग्रह आहे. तो सिंगापुर सरकारची संस्था आणि एसटी अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारातून विकसित करण्यात आला आहे.
डीएस-एसएआर उपग्रह कार्यान्वित झाल्यानंतर तो सिंगापूर सरकारच्या विविध एजन्सींना उपग्रह प्रतिमा पुरवण्याचे काम करेल. तसेच एसटी अभियांत्रिकी त्याचा वापर त्यांच्या व्यावसायिक ग्राहकांसाठी मल्टी-मॉडल आणि उच्च प्रतिसाद प्रतिमा आणि भू-स्थानिक सेवांसाठी करेल.
हा एक अत्याधुनिक उपग्रह असून तो सर्व हवामानात दिवस रात्र अगदी उत्तम छायाचित्रे पाठवण्यास सक्षम आहे.
पीएसएलव्ही-सी 56 यानांद्वारे हे उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. विशिष्ट उद्देशाचे अन्यही सहा उपग्रह यातून प्रक्षेपित केले जाणार आहेत.