पाकचा युद्धाभ्यास “हाय मार्क’वर भारताची नजर; पाकला अजूनही आहे बालाकोट एअर स्ट्राइकची भीती
Updated On:

नवी दिल्ली, दि. 12 – पाकिस्तानच्या एअर फोर्सचा युद्धाभ्यास “हाय मार्क’वर भारत करडी नजर ठेवून आहे. या युद्धाभ्यासात पाकिस्तानचे लढाऊ आणि इतर विमाने समाविष्ट आहेत. सरकारी सूत्रांनुसार, पाकिस्तान एअर स्पेसमध्ये सुरू असलेल्या या युद्धाभ्यासासाठी त्यांनी “नोटीस टू एअरमॅन’ जारी केली आहे. भारत एअर फोर्सची यावर नजर असणार आहे.
पाकिस्तान या युद्धाभ्यासात चायनिज “जे-एफ 17′, “एफ 16′ आणि “मिराज 3′ या सारख्या लढाऊ विमानांचा उपयोग करीत आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या बालाकोट एअर स्ट्राइकसारख्या हल्ल्यांना रोखण्यासाठी पाकिस्तान ड्रिल करीत आहे.





