India vs Bangladesh | Tiger Robi : बांगलादेश संघाच्या कट्टर चाहत्याला प्रेक्षकांकडून मारहाण; ‘टायगर रॉबी’ रुग्णालयात दाखल…

India vs Bangladesh | Tiger Robi : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज (दि. 27) कानपुर येथे दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. मात्र, या सामन्यादरम्यान एक विचित्र प्रकार घडला आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाच्या एका चाहत्याला म्हणजेच ‘टायगर रॉबी’ नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. कसोटीदरम्यान बांगलादेश क्रिकेट चाहत्याला मारहाण झाली असून त्याला रिजन्सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चाहत्याला खुर्चीवर बसवण्यात आल्याने तो अस्वस्थ होताना दिसत होता.
VIDEO | Bangladesh cricket team’s ‘super fan’ Tiger Roby was allegedly beaten up by some people during the India-Bangladesh second Test match being played at Kanpur’s Green Park stadium. He was taken to hospital by the police. More details are awaited.#INDvsBAN #INDvsBANTEST… pic.twitter.com/n4BXfKZhgy
— Press Trust of India (@PTI_News) September 27, 2024
जेव्हा तो बसला होता तेव्हा त्याच्या आजूबाजूला पोलिस आणि पत्रकार होते. ‘टायगर रॉबी’ने त्याच्या पाठीवर आणि खालच्या पोटावर मारल्याचा आरोप केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत.
टायगर रॉबी हा बांगलादेश टीमचा मोठा चाहता असून तो जगभरात होणाऱ्या सामन्यांमध्ये त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसतो. मात्र, आज या चाहत्याला मारहाण झाल्याची झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बांगलादेशचा हा चाहता स्वत:ला ‘सुपर फॅन रॉबी’ म्हणतो. घटनेच्या वेळी त्याने वाघाचा पोशाख परिधान केला होता आणि तो स्टँड सीच्या बाल्कनीत बसला होता.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शदमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.





