India vs Afghanistan T20 Series 2024 : यजमान भारतीय संघाला चकित करु – रशीद खान

Afghanistan to tour India for 3-match T20I series in January 2024 – अफगाणिस्तानचा संघ पुढील वर्षी जानेवारीत भारतात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. या मालिकेत आम्ही यजमान भारतीय संघाला चकित करु असा आत्मविश्वास आफगाणिस्तानचा अव्वल खेळाडू रशीद खान याने व्यक्त केला आहे.
Cricket : कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘असा’ विक्रम करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज…
भारतात नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने अफलातून कामगिरी केली होती. आम्ही या स्पर्धेत उपांत्य फेरीतच नव्हे तर अंतिम फेरीतही स्थान मिळवण्याच्या दर्जाचा खेळ केला होता. मात्र आमच्या संघातील खेळाडूंचा अनुभव थोडा कमी पडला मात्र, आता भारतात भारताविरुद्ध जिंकणे कठीण असले तरीही आम्ही तो चमत्कार करुन दाखवू, असेही रशीद म्हणाला.
टी-२० मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने संध्याकाळी ७ वाजल्यापासून)
– पहिला सामना मोहाली (११ जानेवारी)
– दुसरा सामना इंदुर (१४ जानेवारी)
– तिसरा सामना बंगळुरु (१७ जानेवारी)
आमच्या संघातील अनेक खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. भारतातील वातावरण व खेळपट्ट्या यांचाही अनुभव आहे. त्यामुळे यावेळी घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ जरी भारतीय संघाला मिळणार असला तरीही आम्ही क्षमतेपेक्षा जास्त सरस कामगिरी करु असेही रशीदने सांगितले.





