India-US Trade Deal: भारताने अमेरिकेशी व्यापार करार करताना शेतकर्यांच्या आणि दुग्ध उत्पादकांच्या हिताशी कसलीही तडजोड केलेली नाही, असे स्पष्टीकरण वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केले आहे आणि यासंदर्भात विरोधी पक्षाच्या आरोपांचा ठाम शब्दात इन्कर केला आहे. या विषयावर गोयल संसदेत निवेदन करणार होते. मात्र या विषयावरून आणि इतर कारणावरून संसदेमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे गोयल यांना संसदेत निवेदन करता आले नाही. त्यानंतर पत्रकाराची बोलताना गोयल यांनी सांगितले की भारताने आतापर्यंत ज्या देशाबरोबर व्यापार करार केले आहेत, त्या देशांना भारताने कृषी आणि दुग्धोत्पादनासंदर्भात भारत कसलेही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरच हे करार करण्यात आले आहेत. भारतीय शेतीचे आणि दुग्ध व्यवसायाचे यांत्रिकीकरण झालेले नाही. या कारणामुळे भारतातील जास्त लोकसंख्या या उद्योगावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत विकसित देशातील शेती आणि दुग्धोत्पादन व्यवसायातील शेतकर्याबरोबर भारत स्पर्धा करू शकणार नाहीत. यामुळे भारत इतर देशांची ही उत्पादने कुठल्याही कराराअंतर्गत स्वीकारणार नाही असे सरकारचे स्पष्ट धोरण आहे. Rahul Gandhi: चीनचे रणगाडे 500 मीटर अंतरावर असताना दिल्लीत काय घडत होतं? राहुल गांधींच्या विधानावर संसदेत गदारोळ गोयल यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खास मैत्री आहे. या मैत्रीमुळेच हा भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर असलेला करार झाला आहे. युरोपबरोबर करार करण्यासाठी वीस वर्षे चर्चा करावी लागली होती. मात्र अमेरिकेची झालेला करार केवळ एक वर्षाच्या चर्चेतच पूर्णत्वास आला आहे. हे पंतप्रधानांच्या मुत्सध्येगिरीचे यश असल्याचे ते म्हणाले. तपशील सांगण्यास नकार – करार तत्वतः झाला आहे. कराराचा तपशील दोन्ही देशातील वाणिज्य विभाग ठरविणार आहेत. त्यामुळे कराराचा तपशील उघड करणे बरोबर होणार नाही. गोयल यांनी सांगितले की मला एवढेच माहित आहे की, या करारामुळे भारताचा फायदाच होणार आहे. याबद्दल मला शंका नाही. करारानंतर दोन्ही देशादरम्यानचा व्यापार वाढेल असे ते म्हणाले. अमेरिकेत कृषी उत्पादनावर प्रचंड शुल्क – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतासह इतर देशावर अमेरिकन वस्तूवर जास्त आयातशुल्क लावण्याचा आरोप करत असले तरी प्रत्यक्षात अमेरिकेमध्ये कृषी उत्पादनावर प्रचंड आयात शुल्क आहे. समाधानाची बाब म्हणजे भारताने अमेरिकन कृषी उत्पादने नाकारले आहेत. अमेरिका स्वतः जास्त शुल्क लावत असल्यामुळे अमेरिकेने कदाचित भारताची ही मागणी मान्य केले असल्याचे बोलले जाते. USD INR: डॉलरच्या तुलनेत रुपया झाला मजबूत; भारतात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढणार अमेरिकेमध्ये दुग्धोत्पादनावर तब्बल 188%, फळे आणि भाजीपाल्यावर 132%, कॉफी, चहा, कोका, मसाल्यावर 53%, धान्य आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थावर 193%, तेलबिया, खाद्यतेलावर 164%, तंबाखूवर 150%, धातूवर 187 टक्के आणि रसायनावर 56 टक्के इतके आयात शुल्क आहे. भारताने आतापर्यंत कोणत्याही देशातील या वस्तूवर एवढे आयात शुल्क लावलेले नाही. मात्र भारत इतर देशातील कृषी उत्पादने आणि दुग्धोत्पादने स्वीकारत नाही. आता अमेरिका – भारत कराराचा तपशील बाहेर आल्यानंतर भारत अमेरिकेच्या कोणत्या वस्तूवर किती आयात शुल्क लावणार आहे हे स्पष्ट होणार आहे.