Virat Kohli Retirement : रोहितनंतर विराटही निवृत्तीच्या तयारीत! ‘या’ तीन खेळाडूंना मिळू शकते कसोटी संघात संधी

Virat Kohli likely to retire from Test cricket : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबत बीसीसीआयलाही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत, इंग्लंड दौऱ्यावर त्याला संघाचा भाग होण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु, बोर्डाच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने कोहलीला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
आता जर रोहितनंतर विराटनेही इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर या दोघांच्या जागी कोणाला संधी मिळू शकते? जाणून घेऊया. विराट-रोहितच्या रिक्त जागेसाठी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना संधी मिळू शकते. ज्यांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात स्थान मिळू शकत, ज्यामध्ये, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर आणि करुण नायर यांचा समावेश आहे.
Some bonds are for forever ♾️ #ViratKohli #RohitSharma𓃵 #roko #4518#viratrohit #AUSvIND #icc pic.twitter.com/XgQWzNKUJD
— Chirag Patel (@chiku1504) January 8, 2025
१. साई सुदर्शन –
तमिळनाडूचा डावखुरा फलंदाज बी. साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील कामगिरीने कसोटी संघात स्थान मिळवण्याचा जोरदार दावा केला आहे. २०२४ च्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध ८२ आणि दिल्लीविरुद्ध २१३ धावांची त्याची शानदार खेळी दीर्घकाळ आणि संयमाने फलंदाजी करण्याची त्याची क्षमता दर्शवते. २०२३ च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवा विरुद्ध त्याने केलेले १२५ धावांचे शतक त्याच्या सातत्याचा पुरावा आहे. सुदर्शनने १२ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४२.१५ च्या सरासरीने ८४३ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबर काउंटी क्रिकेटमधील अनुभव आहे.
हेही वाचा –IPL 2025 : आयपीएलचे खेळाडू वंदे भारत ट्रेनने दिल्लीत दाखल, खेळाडूंनी भारतीय रेल्वेचे मानले आभार
२. श्रेयस अय्यर –
श्रेयस अय्यरने २०२१ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि आतापर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये ३६.८६ च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, चौथ्या क्रमांकावर त्याने फक्त एकच कसोटी खेळली आहे, जिथे विराट कोहलीची सरासरी ५० च्या जवळपास आहे. तरीही, अय्यरचा अलीकडील फॉर्म आणि दबावाखाली खेळण्याची क्षमता त्याला या स्थानासाठी परिपूर्ण बनवते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ५० च्या जवळपास आणि स्ट्राईक रेट ८० आहे, ज्यामध्ये १५ शतके आहेत, ती त्याची आक्रमक आणि स्थिर फलंदाजी दर्शवते.
३. करुण नायर –
करुण नायर हा भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या दोन फलंदाजांपैकी एक आहे. २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्धच नाबाद ३०३ धावांची ऐतिहासिक खेळी होती. त्यानंतर तो बराच काळ संघातून बाहेर आहे. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केली. त्याने सहा कसोटी सामन्यांमध्ये ६२.३३ च्या प्रभावी सरासरीने ३७४ धावा केल्या आहेत. २०२४-२५ च्या स्थानिक हंगामात नायरने विदर्भासाठी चमकदार कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने नऊ सामन्यांमध्ये चार शतके आणि दोन अर्धशतकांसह ८६३ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने आठ डावांमध्ये पाच शतकांसह ७७९ धावा केल्या, जे त्याचे अपवादात्मक स्वरूप दर्शवते.





