AFC U17 Asian Cup qualifiers 2024 : पात्रता फेरीतच भारताची मोहीम संपुष्टात….

AFC U17 Asian Cup qualifiers 2024 :- आशियाई चषक २०२५ च्या पात्राता फेरीत भारताच्याच १७ वर्षांखालील संघाला थायलंडकडून ३-२ असा (India vs Thailand) पराभव पत्करावा लागल्याने अंतिम फेरीतील स्थान गमवावे लागले आहे. या पराभवामुळे पुढील वर्षी सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या आशियाई चषक फुटबाॅल स्पर्धेत सहभागाची मोहीम संपुष्टात आली आहे.
FULL TIME in Chon Buri ⌛️
A tough second half sees Thailand take the win in the end.#THAIND #AFCU17 #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/94vI6qeWFd
— Indian Football Team (@IndianFootball) October 27, 2024
अतितटीच्या लढतीमध्ये भारताने २ तर थायलंडने ३ गोल करण्यात यश मिळविले. भारताकडून नगामगौहौ मेटने मध्यंतरानंतर ३४ व्या मिनिटाला गोल करताना भारताचे खाते उघडले. त्यानंतर थायलंडच्या सिवाकोर्न पोन्सनने ३६ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर विशाल यादवने ४२ व्या मिनिटाला पुन्हा थायलंडचा बचाव भेदण्यात यश मिळविले.
त्यामुळे पुन्हा भारताला २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा सिवाकोर्न पोन्सनने ६० व्या मिनिटाला पुन्हा चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलण्यात यश मिळाले. चैवत एनगोएन्माने ८६ व्या मिनिटाला गोल करताना लढतीत ३-२ अशी आघाडी मिळविली व शेवटपर्यंत टिकविली.





